विक्रमगड-नागझरी पुलाचा होणार कायपालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड-नागझरी पुलाचा होणार कायपालट
विक्रमगड-नागझरी पुलाचा होणार कायपालट

विक्रमगड-नागझरी पुलाचा होणार कायपालट

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : नागझरी पुलाची उंची व रुदी अतिशय कमी असल्याने हा पुल रहदारीस धोकादायक होता. याबाबत जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी याबाबत मुख्यमंत्रांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. अखेर या पुलाच्या कामासाठी नगरविकास खात्याकडून ६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता या पुलाचा कायपालट होणार असून या पुलावरील रहदारी सुरक्षित होणार आहे.
नागझरी येथील तांबाडी नदीवर नागझरी गावासाठी पाटबंधारे विभागाने बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्यांची रुंदी अतिशय कमी असून हा बंधारा विक्रमगड व नागझरी या दोन गावांना जोडणार नागझरी गावातील जनतेसाठी मुख्य रस्ता आहे. हा बंधारा खुप जुना व अरुंद असल्याने या बंधाऱ्यावरुन मोठ्या वाहनांची वर्दळच होत नाही. त्यामुळे नागझरी ग्रामस्थांना चारचाकी वाहन आणण्यासाठी फेरा मारुन गाडी गावात आणावी लागते. यामुळे या बंधाऱ्याची रुंदी वाढविण्याची गरज निर्माण झाली होती. याबात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेने पाठपुरावा करुन नविन पुलाची मंजुरी मिळविलेली आहे. या पुलाचे भूमिपूजन कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते करण्यात आले आहे.

असा असणार नवा पूल
जुना पुल तोडून त्या जागी नविन पुल होणार आहे. या पुलाची लांबी ही ९० मीटर, तर रुंदी १० ते १२ मीटर असेल. या कामाचे अंदाजपत्रक तयार झाल्यावर आठ ते नऊ महिन्यात म्हणजेच पुढील पावसाळ्यात हा पुल रहदारीस वापरता येईल, अशी माहिती नगर अभियंता सुदर्शन माकोडे यांनी दिली.

...
येथे दरवर्षी मोठ्या स्वरुपाची महाशिवरात्रीची यात्रा भरत असते. हे गाव ग्रामदान मंडळाखाली कारभार चालतो. परंतु कमी रुंदी असलेल्या पुलावरुन जाने जिकरीचे होत असल्याने येथे नविन पुलाची गरज होती.
-निलेश सांबरे, संस्थापक, जिजाऊ सामाजिक संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96566 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..