रुग्णालयांसाठी आंदोलन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयांसाठी आंदोलन सुरू
रुग्णालयांसाठी आंदोलन सुरू

रुग्णालयांसाठी आंदोलन सुरू

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः विक्रोळी कन्नमवार नगर येथील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूती रुग्णालय यांच्‍या बचावासाठी विक्रोळीकरांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. वारंवार शासनाकडे रुग्णालयाच्या परिस्थितीबाबत निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आता गांधीमार्गाने कायद्याचे पालन करत उपोषणासाठी रितसर परवानगी घेऊन विक्रोळीकर आंदोलनात सहभागी झाले.
विक्रोळीकरांनी क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालय बचाव समिती गठित केली असून या समितीमार्फत हे साखळी उपोषण सुरू असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून विक्रोळीतील दोन महत्त्वाच्‍या रुग्णालयांची अवस्था बिकट होत आहे. तसेच पुनर्विकासाच्या नावाखाली २०१७ पासून क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूती रुग्णालय असून नसल्यासारखे असल्याने विक्रोळीकरांना उपचारासाठी अन्य रुग्णालय गाठावे लागत आहे.
उपनगरात आधीच राजावाडी रुग्णालयावर रुग्णांचा अधिभार पडत आहे. अशावेळी शासनाने विक्रोळीतील या दोन रुग्णालयांचा बचाव करावा व रुग्णांना सर्व सुविधा देऊन ते पुन्‍हा सुरू करावे, या मागणीसाठी विक्रोळीकरांनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासन दरबारी आवाज उठवला आहे. जोपर्यंत शासन मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्णय समितीमार्फत घेण्यात आला आहे.

इशारा देऊनही दुर्लक्ष
साखळी उपोषण करण्यापूर्वी आम्ही राज्य शासन, पालिका, म्हाडा आदींना निवेदन दिले होते. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारादेखील दिला होता. मात्र शासनाकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर आम्हा विक्रोळीकरांना रुग्णालय वाचवण्यासाठी साखळी उपोषण सुरू करावे लागले, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. योगेश भालेराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96573 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..