गोळीबारप्रकरणी दोन आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळीबारप्रकरणी दोन आरोपी अटकेत
गोळीबारप्रकरणी दोन आरोपी अटकेत

गोळीबारप्रकरणी दोन आरोपी अटकेत

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) : शहरामध्ये भरदिवसा दोन भावांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर परिसरात २९ जुलै २०२२ रोजी भरदिवसा रहदारीच्या मुख्य रस्त्यावर तुषार गुंजाळ आणि गणेश गुंजाळ या दोन सख्ख्या भावांवर गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम निष्कासित करण्याच्या कामावरून वाद झाले होते. या हाणामारीत चॉपर, लाकडी दांडगा आणि पिस्तूलाचा वापर करण्यात आला होता. या घटनेत तुषार याचा मृत्यू; तर गणेश जखमी झाला होता. याप्रकरणी संजय बिराजदार (वय ३५), शंकर शिंदे, नेपाळी ऊर्फ रॉकी (वय २५) आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विविध ठिकाणी तपासासाठी पथके रवाना करण्यात आली होती. गोळीबार करणारे संशयित आरोपी शंकर शिंदे आणि सचिन चिकणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96586 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..