वांब, शिंगटी मासा पकडण्यासाठी चंगळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांब, शिंगटी मासा पकडण्यासाठी चंगळ
वांब, शिंगटी मासा पकडण्यासाठी चंगळ

वांब, शिंगटी मासा पकडण्यासाठी चंगळ

sakal_logo
By

पोलादपूर, ता. १३ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. ही मासेमारी नदीच्या किनाऱ्यावर जाळीच्या अथवा गळाच्या साह्याने केली जाते. सध्या पावसाचा जोर कमी झाल्या असून नदीत शिंगटी, वांब, शिवडा आदी मासे सापडत आहेत. यासाठी ग्रामस्थ गाळाने मासे पकडत आहेत.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका दुर्गम असून सावित्री, ढवळी, कामथी अशा नद्या येथून वाहतात. यामध्ये सावित्री नदी मुख्य मानली जाते. या नद्यांमध्ये आदिवासी जाळे टाकून बाराही महिने मासेमारी करतात. हे मासे पोलादपूर मुख्य बाजारात विक्रीसाठी आणले जातात. पोलादपूरकर मोठ्या आवडीने हे मासे विकत घेऊन खातात. यामध्ये विविध प्रकारचे मासे असून, खवले, मळ्या, दांडाळी, पांढरा मासा हे मासे उन्हाळ्यात गळाने मिळतात. काही स्थानिक नागरिक मासे विकत न घेता आवडीने मासे पकडण्यासाठी स्वतः जातात व गळ पद्धतीचा अवलंब करतात. सध्या पाणी मुबलक असल्याने गणेशोत्सवानंतर पोलादपुरातील स्थानिक गळाने मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीकिनारी येत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत मिळणारा वांब व शिंगटी मासा सध्या आदिवासी व पोलादपुरकरांची पसंती ठरत आहे.
आदिवासींना वांब माशाला पोलादपूर बाजारपेठेत २०० ते २५० रुपये भाव मिळतो. हा मासा बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आदिवासी धडपड करत असतात. या वांब माशाचे वैशिष्ट्य म्हणजे तो दुर्मिळ असून वर्षातून फक्त सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांतच मिळतो. तो चवीला अत्यंत चविष्ट असतो. हा मासा पकडण्यासाठी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत नदीकिनारी गळ टाकला जातो. त्यानंतर तीन ते चार वांब मासे मिळतात. वांब माशाला पोलादपुरात ''सुतेरी'' नावानेही बोलले जाते. सध्या या माशाला पोलादपुरात मोठ्या प्रमाणात पसंती आहे. वांब माशाला चांगला भाव मिळत असल्याने आदिवासी बांधवांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने चांगला रोजगार मिळत असतो.

वांब या माशाला चांगला भाव मिळत असून, पोलादपुरात नागरिक या माशाची जास्त खरेदी करत आहेत. त्यामुळे रोजगार चांगल्या प्रमाणात मिळत आहे.
- नीला चव्हाण, आदिवासी

वांब मासा वर्षातून फक्त दोन महिनेच नदीला मिळतो. तो अत्यंत चविष्ट असून, चुलीवर कालवण चवदार होते. स्वतः गाळाने पकडण्याची एक वेगळीच मज्जा आहे.
- निवेदन दरेकर, गळाने मासे पकडणारे स्थानिक

वांब मासा महाग असला, तरी तो अत्यंत चविष्ट आहे. कमी प्रमाणात मासा उपलब्ध असल्याने मिळेल त्या भावाला विकत घेतो. कारण एरव्ही हा मासा पाहायला सुद्धा मिळत नाही.
- रोशन दुधाने, ग्राहक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96590 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..