राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्णशोध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्णशोध मोहीम
राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्णशोध मोहीम

राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्णशोध मोहीम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिल्यावर कुष्ठ आणि क्षय रोगाचे लवकर निदान होऊन लवकर उपचार होण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग आणि क्षयरुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी सोमवारी (ता. १२) बैठक घेतली. त्यामध्ये जास्तीत जास्त कुष्ठ आणि क्षयरुग्ण शोधून उपचारांवर आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकर, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, अलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट ॲथोनी, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पै, महाराष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीत, कुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.
...
अभियान असे
- राज्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अभियान सुरू.
- याअंतर्गत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
- राज्यातील सुमारे पावणे दोन कोटी घरांना भेटी देणार.
- सुमारे ६५ हजार पथके तयार करण्यात आली आहेत.
- चौदा दिवसांत सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल.
- ग्रामीण भागातील २० तर शहरी भागातील २५ घरांना दररोज भेटी दिल्या जातील.
...
कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.
---
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96602 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..