मुले चोरणाऱ्या महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुले चोरणाऱ्या महिलेला अटक
मुले चोरणाऱ्या महिलेला अटक

मुले चोरणाऱ्या महिलेला अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबईतील बोरिवली येथील एका फूटपाथवर राहणाऱ्‍या दाम्पत्याच्या तीन वर्षांचे मूल चोरल्याप्रकरणी दिल्लीतील ३५ वर्षीय महिलेला बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेचे नाव अंजू वाल्मीकी आहे. आरोपीने पैशांसाठी मूल चोरी केले असल्याचे सांगितले. आरोपी महिला भिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. बोरिवली जीआरपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिच्या मुली तीन दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईत आल्या. महिलेने बोरिवली स्थानकाबाहेर राहणाऱ्या जोडप्याशी मैत्री केली. रात्री आरोपी महिला मुलाला घेऊन पसार झाली. मुलाला घेऊन निघण्यापूर्वी आरोपी महिला तीन दिवस मुलाच्या कुटुंबासोबत राहत होती. सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेला अटक केली आणि चिमुरडीची सुटका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96608 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..