रस्ते अपघातांत कमावत्या व्यक्तींच्या मृत्युसंख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते अपघातांत कमावत्या व्यक्तींच्या मृत्युसंख्येत वाढ
रस्ते अपघातांत कमावत्या व्यक्तींच्या मृत्युसंख्येत वाढ

रस्ते अपघातांत कमावत्या व्यक्तींच्या मृत्युसंख्येत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः रस्त्यांवर झालेल्या वाहन अपघातांमध्ये हजारो कुटुंबीयांचे छत्र हरवले आहे. कमावता माणूस अपघातात अकाली गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये वय वर्षे ३५ ते अधिक वयाच्या चालक, प्रवासी, पादचारी सायकलस्वारांच्या मृत्यूंची संख्या पाहता तब्बल ६,०२८ पुरुष; तर ८१४ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून पुढे येत आहे.
वर्ष २०२० मध्ये एकूण वयोगटातील चालक, प्रवासी, पादचारी आणि सायकलस्वारांच्या मृत्यूंची संख्या बघितल्यास १०,३३३ पुरुष; तर १,२३६ महिलांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत गेल्या वर्षी २०२१ मध्ये यामध्ये वाढ होऊन १२,१६० पुरुष १,३६८ महिलांचा मृत्यू होऊन हजारो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्ग पोलिसांनी अपघातांच्या वयोगटांचा अभ्यास करताना १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्यांचीसुद्धा आकडेवारी मिळवली असून त्यामध्ये ३१४ युवक आणि ५९ युवतींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
त्याशिवाय अपघातात मृत्यूंच्या तुलनेत जखमींची संख्या अधिक आहे. एकूण वयोगटातील चालक ९,७१३ पुरुष; तर ४६६ महिला जखमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये ६,२६१ पुरुष, २,४८७ महिला, पादचाऱ्यांमध्ये २,९८१ पुरुष; तर ८८६ महिला, सायकलस्वार २५२ पुरुष; तर २५ महिला अशा एकूण १९,२०७ पुरुष; तर ३,८६४ महिला रस्त्यांवरील अपघातांमध्ये जखमी झाल्या आहेत.
...
पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात
रस्त्यांच्या कडेवरून पादचाऱ्यांनी चालावे यासाठी पादचारी मार्ग तयार केला जातो; मात्र राज्यभरातील रस्त्यांच्या कडेला असलेले पादचारी मार्ग अतिक्रमाणाच्या विळख्यात गेल्याचे दिसते. रस्त्यालगत असलेले फेरीवाले, दुकान मालकांनी त्यावर कब्जा करून अतिक्रमण थाटले आहे. परिणामी, पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालावे लागत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.
...
गेल्या वर्षभरातील मृतांची आकडेवारी
प्रकार - पुरुष - महिला
चालक - ६५७९ - १५०
प्रवासी - ३१६३ - ८१६
पादचारी - २२८७ - ३९०
सायकलस्वार - १३१ - १२
एकूण - १२१६० - १३६८
...
वयोगटाप्रमाणे एकूण मृत
वयोगट - पुरुष - महिला
१८ पेक्षा कमी - ३१४ - ५९
१८-२५ - २२५५ - १५१
२५-३५ - ३४१४ - ३३३
३५-४५ - ३२४६ - ३९२
४५ - ६० - २२८७ - २९५
६० पेक्षा जास्त - ४९५ - १२७
वय माहिती नसलेले - १४९ - ११
एकूण - १२१६० - १३६८

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96609 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..