ऍक्टिव्हा दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऍक्टिव्हा दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड
ऍक्टिव्हा दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड

ऍक्टिव्हा दुचाकी चोरणारा सराईत चोरटा गजाआड

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १२ (बातमीदार) : केवळ मौजमजा, गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी एका ठिकाणाहून ॲक्टिव्हा दुचाकी चोरून दुसऱ्या ठिकाणी लगेच सोडून देऊन फरार होणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- २ वसई युनिटला यश आले आहे. या चोरट्याकडून सहा ॲक्टिव्हा जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर मुंबई, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय अशा‍या विविध पोलिस ठाण्यांत २० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपीने विविध ठिकाणी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

आमन शेख (वय २३) असे अटक आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी येथील राहणारा आहे. वसई पूर्व तुंगारेश्वर रोड येथून २० ऑगस्ट २०२२ रोजी राकेशकुमार यादव यांची ॲक्टिव्हा गाडी चोरली होती. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. ॲक्टिव्हा गाड्यांचे वाढते चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन गुन्हे शाखा कक्ष- २ वसई युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, माहिती गोळा करून आरोपीला जोगेश्वरी परिसरातून सापळा रचून अटक केली. हा आरोपी आतापर्यंत १४ गुन्ह्यांत तुरुंगात जाऊन आला आहे. आरोपीकडून सहा ॲक्टिव्हा गाड्या, एक मोबाईल असा एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी चोऱ्या
आरोपी हा पूर्वी विरारमध्ये राहत होता. आता तो जोगेश्वरी येथील एका झोपडपट्टीत राहतो. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून आरोपी चोरी करत आहे. केवळ गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी गाड्या चोरून, दुसऱ्या ठिकाणी सोडून तो फरार होत असे. सध्या हा आरोपी माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून आणखी मोठ्या गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे, असे गुन्हे शाखा कक्ष- २ वसईचे प्रभारी पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96610 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..