जलतरणपटू वेद दुसा याची भारतीय संघात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरणपटू वेद दुसा याची भारतीय संघात निवड
जलतरणपटू वेद दुसा याची भारतीय संघात निवड

जलतरणपटू वेद दुसा याची भारतीय संघात निवड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाण्यातील जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. फिना वर्ल्ड चॅम्प‍ियनशिपसाठी भारतीय संघात निवड होणारा वेद हा ठाण्यातील आतापर्यंतचा एकमेव जलतरणपटू आहे. वेद दुसा हा ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्टस् फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे घेत आहे. वेद दुसा याची निवड झाल्याबद्दल प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले. ही स्पर्धा ही १५ ते १८ सप्टेंबर या कालावधी सियचल्स देशात होणार असून या स्पर्धेसाठी वेद रवाना होण्यापूर्वी त्याची निवड झाल्याबद्दल नुकतेच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच कोकण पदवीधर मंचचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी दिल्या.
भारतीय जलतरण संघटनेचे महाराष्ट्राचे कन्व्हेनर राजेंद्र पालकर, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सदस्य राजेशे मोरे यांनी महाराष्ट्राच्या जलतरणपटू भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वेदचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, कै. मारोतराव शिंदे तरणतलावाच्या व्यवस्थापक रिमा देवरूखकर, कळवा येथील तरणतलावाचे व्यवस्थापक रवी काळे यांनीदेखील त्याचे कौतुक केले. प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे, रूपेश घाग यांच्याकडून तो जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96615 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..