ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी ही योजना बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. अशा पद्धतीने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे अन्यायकारक असून ही शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ठाणे ओबीसी एकीकरण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, शासन निर्णय २ ऑगस्ट २०२२ नुसार राज्यातील रहिवासी असणाऱ्या व परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निर्णय सरकारने रद्द केल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाचे प्रचलित धोरण विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबत धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन असल्याचे कारण देऊन २५ मार्च २०२२ रोजीचा शासन निर्णय २ ऑगस्ट २०२२ च्या निर्णयानुसार रद्द केला आहे. या संदर्भात ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, मेघनाथ घरत, राहुल पिंगळे, प्रशांत हडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96616 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..