मनोज बाडकर तटरक्षक दलाचे कमांडर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोज बाडकर तटरक्षक दलाचे कमांडर
मनोज बाडकर तटरक्षक दलाचे कमांडर

मनोज बाडकर तटरक्षक दलाचे कमांडर

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मनोज वसंत बाडकर यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिमी भागाचे नवे कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. मुंबईत १२ सप्टेंबर रोजी मनोज वसंत बाडकर यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी मनोज बाडकर यांनी महानिरीक्षक पदावर काम केले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर म्हणून ते महाराष्ट्र, गोवा, केरळ, लक्षद्वीप बेटे आणि कर्नाटक राज्यांसह तटरक्षक दलाच्या संपूर्ण पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहेत.
मनोज बाडकर यांची २०१८ मध्ये महानिरीक्षक (आयजी) पदावर पदोन्नती झाली. तत्पूर्वी ते २००६ ते २००८ पर्यंत कर्नाटक आणि २०१३ ते २०१८ पर्यंत गोवा राज्याचे कोस्ट गार्ड प्रमुख होते. त्यांच्या ३६ वर्षांमध्ये उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी अनेक तटरक्षक जहाजांचे तसेच तटरक्षक दलाच्या स्थानकांचे नेतृत्व केले आहे. मनोज बाडकर यांचा जन्म कर्नाटकमधील कारवार येथे सामान्य कुटुंबात झाला. कारवारमध्ये सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले; तर कारवारच्या शासकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96622 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..