दसरा मेळाव्यासाठीच्या अर्जाची छाननी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्यासाठीच्या अर्जाची छाननी सुरू
दसरा मेळाव्यासाठीच्या अर्जाची छाननी सुरू

दसरा मेळाव्यासाठीच्या अर्जाची छाननी सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील शिवाजी पार्क मैदान यंदा दसरा मेळाव्यासाठी कुणाला मिळणार यासाठी शिवसेनेच्या दोन गटांत स्पर्धा लागली आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यापूर्वी दसरा मेळाव्यासाठी कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे, हे तपासले जाणार आहे. पालिकेचा जी-नॉर्थ विभाग छाननी करत आहे. या माहितीचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार असून आयुक्त यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित केला जातो आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे बंदिस्त सभागृहात ऑनलाईन पद्धतीने दसरा मेळावा घेण्यात आला. कोरोना नियंत्रणात असल्याने निर्बंध हटवल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार हे निश्चित होते; मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरवले आहे. ३१ ऑगस्टला शिंदे गटानेही तसा पालिकेला मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापूर्वी नेहमीप्रमाणे शिवसेनेनेही २२ ऑगस्टला परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे. परवानगी कुणाला द्यायची हा पेच पालिकेसमोर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96627 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..