बालसुधारगृहातून पळालेल्या मुली परतल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालसुधारगृहातून पळालेल्या मुली परतल्या
बालसुधारगृहातून पळालेल्या मुली परतल्या

बालसुधारगृहातून पळालेल्या मुली परतल्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबईतील गोवंडी भागातील सुधारगृहातून तब्बल सहा अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या. रविवारी पहाटे खिडकीचे ग्रील दगडाने तोडून पळ काढला होता. काही तासांनंतर रविवारी रात्री दोन मुली स्वेच्छेने सुधारगृहात परतल्या. मुली पळून गेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा गोवंडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपासात पळालेल्या मुलींना कोणी तरी पळून जाण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोवंडी पोलिस त्या मुलींची चौकशी करत असून पळून गेलेल्या इतर मुलींचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96636 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..