पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस यार्डच्या कामासाठी रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. परिणामी या ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक २२०९४ भुज-बांद्रा टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस १३ सप्टेंबर रोजी बोरिवलीपर्यंतच चालवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक १९००४ भुसावळ-बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२९३६ सुरत-बांद्रा टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस १४ सप्टेंबरला बोरिवलीपर्यंत चालवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमध्ये उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहितीसुद्धा पश्चिम रेल्वेने दिलेली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96638 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..