शेलारांची बदनामी केल्याप्रकरणी चोघांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलारांची बदनामी केल्याप्रकरणी चोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेलारांची बदनामी केल्याप्रकरणी चोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेलारांची बदनामी केल्याप्रकरणी चोघांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार आणि भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अनिल कोकीळ, नीलेश पारडे, विजय तेंडुलकर आणि आकाश बागूल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व जण आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे.
आशीष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहीन फोटो शोधून समाजमाध्यमांत जी माझी बदनामी करीत आहेत, त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेली २५ वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने ते सैराटले आहेत.
भाजपचे प्रदेश सचिव हैदर आझम यांनी सांगितले, की ज्या लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे ते सर्व जण युवासेनेचे आहेत. या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96641 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..