आयआयटी मुंबईची ब्लड कॅन्सरवर नवी उपचार पद्धती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटी मुंबईची ब्लड कॅन्सरवर नवी उपचार पद्धती
आयआयटी मुंबईची ब्लड कॅन्सरवर नवी उपचार पद्धती

आयआयटी मुंबईची ब्लड कॅन्सरवर नवी उपचार पद्धती

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : आयआयटी मुंबईने भारतात पहिलीवहिली अशी स्वदेशी बनावटीची सीएआर-टी (CAR-T) सेल उपचार पद्धती विकसित केली आहे. लिम्फोमा या ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी ही पद्धती महत्त्वाची ठरणार आहे. या चाचणीच्या पहिल्या टप्प्यातील आकडेवारी आणि परिणाम समोर आले आहेत. आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ही चाचणी पार पाडली गेली. उपचार करण्यात आलेले सर्व रुग्ण सुरक्षित असल्याचे चाचणीत आढळले आहे.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे चाचणीचा पहिला टप्पा पार पडला. या चाचणीसाठी दहा रुग्णांची निवड गेल्या वर्षभरात करण्यात आली. त्यापैकी सर्व प्रौढ अशा सहा रुग्णांवर HCAR१९ उपकरणाचा वापर करून उपचार करण्यात आले. या चाचणीमध्ये अतिशय सकारात्मक असे निकाल समोर आले आहेत. या उपचारादरम्यान कोणत्याही रुग्णाला आयसीयूची गरज भासली नाही. उपचारादरम्यान कोणत्याही व्यक्तीला मृत्यू झाला नाही. लिम्फोमा या आजारासाठीच्या क्लिनिकल ट्रायल्स अतिशय सकारात्मक आढळल्या आहेत. दहापैकी तीन रुग्णांनी या सेल थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आहे. आयआयटी मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनी सीएआर-टी (CAR-T) प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96645 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..