माकडाच्या दहशतीपासून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माकडाच्या दहशतीपासून सुटका
माकडाच्या दहशतीपासून सुटका

माकडाच्या दहशतीपासून सुटका

sakal_logo
By

तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : पंधरा दिवसांपासून पावणे गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या सदस्यांना पकडले आहे. भुकेने व्याकुळ असलेल्या या माकडाने अन्नाच्या शोधात पावणे गावातील घरांवर उड्या मारून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे दहशतीखाली असलेल्या रहिवाशांनीदेखील सुटकेचा श्वास घेतला आहे.
पावणे गावात गेल्या काही दिवसांपासून अन्नाच्या शोधात आलेल्या माकडाने नागरिकांना हैराण केले होते. गावालगत असणाऱ्या खाद्यपदार्थ, फळे व भाजीपाला पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये या माकडाचा वावर होता. अनेकदा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण होते. अशातच सोमवारी दुपारी हे माकड पावणे गावातील प्लॉट नं. सी - १० किसान काँनेक्ट सेफ फूड प्रा.लि. नावाच्या कंपनीतील फळांची व भाजीपाल्याची नासधूस करत असल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. याबाबत तातडीने वरिष्ठ अधिकारी हेमंत वाडेकर यांना कळविण्यात आले. या वेळी वाडेकर यांनी वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना या प्रकाराची कल्पना दिली. त्यानुसार संस्थेच्या सदस्यांनी पिंजरा लावून अखेर या माकडाला जेरबंद केले.

दोन तासांचे अथक परिश्रम
कंपनीत मोठ्या प्रमाणात असलेल्या सामानामुळे या माकडाला पकडण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे माकड असलेल्या रूममधील सामान बाहेर काढण्यात आले. यासाठी कंपनीचे कामगार आणि संस्थेच्या सदस्यांचा तब्बल दोन तास अथक परिश्रम करावे लागले. या मोहिमेत वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे दीपक गायकवाड, आशिष साळुंखे, मयूर दळवी, दीपक भंगारत, अजय जवीर, हर्षल वालावलकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96647 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..