कल्याण डोंबिवलीकरांना आनंदवार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीकरांना आनंदवार्ता
कल्याण डोंबिवलीकरांना आनंदवार्ता

कल्याण डोंबिवलीकरांना आनंदवार्ता

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवलीकरांचे प्रदूषणमुक्त प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक बस कल्याण-डोंबिवली शहरात धावणार असून त्याची तयारी केडीएमटी प्रशासन करत असून ती अंतिम टप्‍प्यात आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या १५ व्या वित्तीय आयोगातून (केडीएमटी) परिवहन उपक्रमासाठी २०७ बस मंजूर झाल्‍या असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे. त्यातील पहिल्या टप्‍प्यातील ३७ कोटी रुपये केडीएमसीकडे वर्ग झाले आहेत. २०२० ते २०२६ या आर्थिक वर्षात प्रत्येक वर्षाला इलेक्ट्रिक बस ताफ्‍यात येणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत केडीएमटीच्या पहिल्या टप्‍प्यात ११२ ईव्‍ही बस ताफ्‍यात येणार असून त्याची तयारी सुरू करण्‍यात आली आहे. महिनाभरावर आलेल्‍या दिवाळीच्या मुहूर्तावर ११२ पैकी २५ बस रस्त्यावर धावतील, असे नियोजन सुरू असल्याची माहिती केडीएमटीचे व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. केडीएमटीच्‍या ताफ्‍यात सध्या १४४ हून अधिक बस असल्या, तरी ७० ते ८० बस रस्त्यावर काढण्यात केडीएमटी प्रशासनाला यश येत आहे. दरम्यान, नवीन इलेक्ट्रिक बस चालवताना त्याची तूट शासन देणार असल्याने केडीएमटीसह अन्य परिवहन संस्थांना दिलासादायक बाब आहे. खासगीकरणामधून ही बससेवा चालवली जाणार असून, आगामी पाच वर्षांत २०७ इलेक्ट्रिक बस केडीएमटीच्या ताफ्‍यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96651 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..