जव्हारमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले
जव्हारमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

जव्हारमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

sakal_logo
By

जव्हार, ता. १३ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून जव्हार शहर व ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला आहे. त्यातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे; तर थंड वारेही अधूनमधून सुटत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, डोके दुखणे, ताप येणे, नाकातून पाणी येणे आदी आजारांचे रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयात दिवसाला तीनशेपेक्षा अधिक रुग्ण तपासणी होत आहे. अशा वेळी गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा, तसेच लहान मुले तसेच वृद्धांची काळजी घेणे गरजेचे असून त्यांना पाणी उकळून पाजावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत पावसाचे दिवस असतानाच अधूनमधून दिवसा उष्णतेत वाढ होत आहे. पावसाळी वातावरण आणि रखरखते ऊन यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा वेळी पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान बालकांना ताप, सर्दी, खोकला असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घेऊन उपचार करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे; तर वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे उपचार करून घेण्यासाठी खासगी व शासकीय दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:बरोबर लहान मुलांची तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. बाजारहट करते वेळेस गर्दीचे ठिकाण टाळावे. वातावरणातील दूषित विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
....
ताप अंगावर काढणे धोक्याचे
ताप आल्यास याबाबत घरचा कोणताही उपाय करू नये. लगेच जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टरांनी दिलेली औषधी वेळेवर घ्यावी. ताप उतरेपर्यंत दररोज पाणी उकळून प्यावे. कुटुंबप्रमुखांनी लहान मुले तसेच वृद्धांची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
...
मागील दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खोकला, सर्दी, ताप, अंग दुखणे, डोके दुखणे, पोट दुखणे आदी आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदललेल्या वातावरणामुळे ही साथ पसरत आहे. पालकांनी लहान मुलांची तसेच वृद्ध मंडळींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताप किंवा सर्दी हा आजार अंगावर काढू नये. लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96653 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..