शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रिया शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रिया शिबिर
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रिया शिबिर

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग शस्त्रक्रिया शिबिर

sakal_logo
By

शहापूर, ता. १३ (बातमीदार) : शहापुरातील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालरोग शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरासाठी प्रसिद्ध बालरोग शस्त्रक्रियातज्‍ज्ञ डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी, बालरोग शस्त्रक्रियातज्‍ज्ञ, डॉ. जयश्री कोरे यांची उपस्‍थिती होती. या शिबिरामध्ये सहा बालकांच्या शस्त्रक्रिया होऊन २८ शस्त्रक्रियेचे बाह्यरुग्ण तपासण्यात आले. हे शिबिर डॉ. मनोहर बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय शहापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये डॉ. अभरणा शेट्टी, डॉ. संकेत कुलकर्णी, डॉ. सचिन जाधव, डॉ. शोभा बनगर, डॉ. सुवर्णा सुरवाडे, डॉ. गायकवाड यांचे सहकार्य मिळाले. दरम्‍यान, शिबिराच्‍या माध्‍यमातून मार्च २०१७ पासून जानेवारी २०२० पर्यंत ३८३ बाल शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत ५० बाल शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96659 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..