बोर्डी अस्वली रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डी अस्वली रस्त्याची दुरवस्था
बोर्डी अस्वली रस्त्याची दुरवस्था

बोर्डी अस्वली रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

बोर्डी, ता. १३ (बातमीदार) : बोर्डी अस्वली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
बोर्डी ते अस्वली या नऊ किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरणाचे काम चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली. त्यानंतर तात्पुरती डागडुजीव्यतिरिक्त कोणतही काम झालेले नाही. यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आदिवासी लोकवस्ती असलेल्या अस्वली जांबुगांव खनुवडे भागातून हजारो कामगार या मार्गावरून रोजगार मिळवण्यासाठी तसेच हजारो विद्यार्थी बोर्डी, बोरीगाव येथील शाळा कॉलेजमध्ये शिक्षणासाठी येत असतात. तसेच शेतकरी शेतमालाच्या विक्रीसाठी ग्रामीण भागातून येत असतात. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96661 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..