संस्कृत पाठांतर स्पर्धेत वेदांत कोंडविलकर, सुजल जाधव यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत पाठांतर स्पर्धेत वेदांत कोंडविलकर, सुजल जाधव यशस्वी
संस्कृत पाठांतर स्पर्धेत वेदांत कोंडविलकर, सुजल जाधव यशस्वी

संस्कृत पाठांतर स्पर्धेत वेदांत कोंडविलकर, सुजल जाधव यशस्वी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या वतीने आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यामध्‍ये घाटकोपर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील वेदांत कोंडविलकर आणि सुजल जाधव यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. या वेळी संस्थेच्या वतीने त्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे संचालक विजय पवार, संचालिका दीपाली पवार, मुख्याध्यापक जगदीश चौधरी, त्याचप्रमाणे मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर ही संस्था गेल्‍या ७७ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. प्रागतिक संघ ही या संस्थेची शाखा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे तसेच संस्कृत भाषा संवर्धनाचे काम करते. शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची गोडी लागावी आणि भाषेवर प्रभुत्व मिळावे यासाठी आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचे रविवार ११ सप्‍टेंबर रोजी मुंबई सेंट्रल, मराठा मंदिर येथील जिवाजीराजे महाराज सभागृहात आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि उपनगरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे आयोजन मराठा मंदिर प्रागतिक संघाचे अध्यक्ष प्रदीप विचारे आणि उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96664 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..