झाई-बोरीगावमध्ये तिरंगी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाई-बोरीगावमध्ये तिरंगी लढत
झाई-बोरीगावमध्ये तिरंगी लढत

झाई-बोरीगावमध्ये तिरंगी लढत

sakal_logo
By

बोर्डी, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर रणनीती ठरवण्यासाठी विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. अशात झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. कारण झाई-बोरीगाव ग्रामपंचायतची निवडणूक भाजप, माकप आणि बविआ या तिन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक १३ ऑक्टोबरला रोजी होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाची थेट निवडणूक होणार असल्यामुळे तिरंगी लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ८०८२ लोकसंख्या असलेल या ग्रामपंचायतीत ५२३० मतदार असून सहा वॉर्डातून दोन सर्वसाधारण, नऊ महिला; तर सहा अनुसूचित जाती अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
झाई-बोरीगाव ग्रामपंचायतची निवडणूक भाजप, माकप आणि बविआ या तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. २००९ लोकसभा निवडणुकीत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने विजय मिळवल्यानंतर या भागात बविआचे चांगले वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न बविआचा असेल; तर दुसरीकडे दिवंगत खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, लक्ष्मण वरखंडा, प्रकाश सांबर यांनी झाई ग्रामपंचायत क्षेत्रात भाजपने पक्षबांधणीचे प्रयत्न केले; मात्र वनगा, धनारे, आणि वरखंडा या दिग्गज नेत्याच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे येथील काही कार्यकर्ते नाराज होऊन भाजपला राम राम ठोकून अन्य पक्षात गेले; पण केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेमुळे ही ग्रामपंचायतीत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
झाई ग्रामपंचायत डहाणू विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले करीत आहेत. तलासरी तालुक्यातील माकपचा दबदबा आहे, येथील काही उमेदवार पक्षाच्या नावाखाली लढत नसले, तरी अपक्ष राहून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अजेंडा चालवित असल्याने या पक्षासाठी झाई ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठित ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96665 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..