सरंक्षक भिंत कोसळून तिघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरंक्षक भिंत कोसळून तिघे जखमी
सरंक्षक भिंत कोसळून तिघे जखमी

सरंक्षक भिंत कोसळून तिघे जखमी

sakal_logo
By

उरण, ता. १३ (वार्ताहर)ः करंजा सातघर येथील राहत्या घरावर संरक्षक भिंत पडल्याची घटना मंगळवारी (ता. १२) रात्री घडली आहे. या घटनेत घरातील महिला व तिची दोन मुले जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा सातघर येथील रहिवासी महेंद्र पाटील यांच्या राहत्या घरांवर अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारात घरातील एका खोलीत झोपलेल्या संगीता पाटील व त्यांची दोन मुले कुणाल, दिपेश गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, तलाठी तेजस चौरले, मंगेश थळी यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96686 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..