पोलिसाला मारहाण करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसाला मारहाण करणारा अटकेत
पोलिसाला मारहाण करणारा अटकेत

पोलिसाला मारहाण करणारा अटकेत

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः टी जंक्शनजवळ कर्तव्य बजावत असलेल्या दिनकर जायभाय या पोलिस कर्मचाऱ्याला रविवारी (ता. ११) शमशेर आलम याने मारहाण केली होती. त्यानंतर तो पीएमजीपी वसाहतीच्या दिशेला पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडले. जायभाय यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मानखुर्दच्या टी जंक्शनजवळ रविवारी वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी दिनकर जायभाय हे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी शमशेर त्या ठिकाणी आला व त्याने शिवीगाळ केली. येथे उभा राहून फोटो काढतोस काय, असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मारहाणीमुळे जायभाय खाली पडले. त्यानंतर जायभाय यांची कॉलर पकडून पुन्हा येथे दिसल्यास प्राणघातक हल्ला करण्याची धमकी दिली. जायभाय यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यावर शमशेरने तिथून काढता पाय घेत एमजीपीच्या दिशेला पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96689 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..