महडमध्ये लोटला भक्तांचा जनसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महडमध्ये लोटला भक्तांचा जनसागर
महडमध्ये लोटला भक्तांचा जनसागर

महडमध्ये लोटला भक्तांचा जनसागर

sakal_logo
By

खोपोली, ता. १३ (बातमीदार)ः गणेशोत्सवानंतर आलेल्या अंगारकीनिमित्ताने अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र असलेल्या महड येथील वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटे चार वाजल्यापासून महाआरतीसाठी मंदिरात रांगा लागल्या असून दुपारपर्यंत ४० ते ४२ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथील वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सकाळपासूनच गणपती संस्थान स्वागत कमानीपर्यंत भक्तांची रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर ही रांग महड वळण रस्त्यापर्यंत पोहली होती. या गर्दीमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याचे दिसले. यावेळी महड मंदिर सभामंडपात विविध फुले, कडधान्य वापरून साकारलेली आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. तसेच बाप्पाचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून देवस्थान व्यवस्थापन कमिटीने आणि पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठीचे नियोजन केले होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
खोपोली : अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक क्षेत्र महड येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96690 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..