रायपूरजवळ पूलासाठी प्रशासनाकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायपूरजवळ पूलासाठी प्रशासनाकडून पाहणी
रायपूरजवळ पूलासाठी प्रशासनाकडून पाहणी

रायपूरजवळ पूलासाठी प्रशासनाकडून पाहणी

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील रायपूर गावातून डोंगरखाडी नदी वाहते. गावातील नदीपलिकडे राहणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमीत जाण्यासाठी डोंगरखाडी नदीपात्रातून पुढे जावे लागत असल्याचे वृत्त दै. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल तालुका प्रशासनाने घेतली असून, डहाणू पंचायत समिती गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी नदीवर पूल बाधण्यासाठी या परिसराची पाहणी केली. त्यांनतर शुक्रवारी डहाणू पंचायत समितीचे उपअभियंता प्रशांत फुलेवार यांनी रायपूर गावातील नदीजवळील स्थळाची पाहणी करून मोजणी केली आहे.
डहाणू तालुक्यातील आष्टा-रायपूर ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आष्टा येथील डोंगरातून वाहणाऱ्या डोंगरखाडी नदी रायपूर गावाच्या मधून वाहते. नदीच्या पलीकडे गवळीपाडा, माढापाडा, कालातपाडा आदी पाडे आहेत. रायपूर गावात दोनही बाजूला नदी पर्यंत रस्ता आहे. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात नदीपलीकडे गवळीपाडा परिसरात कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना नदीपात्र ओलांडून यावे लागते. तसेच स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यविधी पार पाडवा लागतो. याबाबत दै. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार येथे नदीवर पूल बांधण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे.
.....
पूल बांधण्यासाठी परिसराची पाहणी केली असून जागेची मोजणी करून वरिष्ठ पातळीवर पुढील अहवाल पाठवण्यात येईल. पुलासाठी लागणारी जागेची माहिती, त्यासाठी लागणारा निधी वरिष्ठ पातळीवरून मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- पल्लवी सस्ते, गट विकास अधिकारी, डहाणू
......
या भागात पावसाळ्यात अनेक अडचणी येतात. या नदीकिनारी ग्रामस्थांसाठी रस्ता तयार केलेला आहे. पूल नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- काशिनाथ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य, पालघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96691 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..