टीएमटीच्या बसअभावी नव्‍या मार्गिका बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीएमटीच्या बसअभावी नव्‍या मार्गिका बंद
टीएमटीच्या बसअभावी नव्‍या मार्गिका बंद

टीएमटीच्या बसअभावी नव्‍या मार्गिका बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : गायमुख ते ठाणे स्थानक, दुसरीकडे ठाणे ते शिळफाटा असा पसारा असलेल्या ठाणे परिवहनची सेवा वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र, बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नवीन मार्ग सुरू करण्यासाठी टीएमटीला अडचण येत असल्याचे समोर आले आहे. २० सीएनजी आणि १२३ नव्या बस टीएमटीच्या ताब्यात आल्यानंतरच हे नवीन मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
२०२२ चा ४५८ कोटी १३ लाखांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या परिवहन सेवेत ठाणेकरांना प्रवासाची सुविधा देण्यासाठी केवळ ३३३ बस उपलब्ध आहेत. यातील टीएमटीच्या फक्त ११० बस असून उर्वरित कंत्राटी आहेत. त्यातही केवळ २६९ बसच्या हिमतीवर प्रवाशांना परिवहन सेवा देत आहे. यात सरकारच्या १९० आणि पालिकेच्या ७९ बसची संख्या आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमांतून २०० बस, पीपीपी तत्त्वावर एमएमआरडीएकडून १०० इलेक्‍ट्रिक बस व ठाणे महापालिकेकडून ५० मिडी बस खरेदी करण्याचे नियोजन होते. हे नियोजन कागदावरच राहिले. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार नव्या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी परिवहन सेवा १४३ बस परिवहनच्या ताफ्यात समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

डोंबिवली, नवी मुंबई, विरारपर्यंत मिळणार सेवा
सध्याच्या स्थितीला ठाणे-बोरिवली या मार्गावर केवळ १० वातानुकूलित बस धावत आहेत. या व्यतिरिक्त पालिका हद्दीच्या बाहेर ठाणे परिवहनची एकही बस धावत नाही. ठाणे परिवहनकडे नव्या बस आल्यानंतर संख्येत वाढ होणार आहे. त्यानंतर डोंबिवली, नवी मुंबई, विरार मार्गावर ठाणे परिवहनच्या बस धावतील, अशी माहिती ठाणे परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली.

१५३ गाड्या निकाली
परिवहनच्या कळवा, वागळे आगारात भंगारातील १५३ गाड्या निकाली काढण्यात आल्याने बसची संख्या कमी झाली. नव्या बस मिळताच सध्या सुरू असलेली सेवा सुरळीत चालवून अतिरिक्त बस या नव्या रूटवर चालविण्याचा मानस परिवहन व्यवस्थापनाचा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96692 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..