नियोजनासाठी पाणी वितरणात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियोजनासाठी पाणी वितरणात बदल
नियोजनासाठी पाणी वितरणात बदल

नियोजनासाठी पाणी वितरणात बदल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईच्या पूर्व उपनगरांतील डोंगराळ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या समस्‍येबाबत पालिका या ठिकाणी लवकरच सर्वेक्षणाची मोहीम हाती घेणार आहे. स्थानिकांकडून पाणी संबंधातील तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच पालिकेने कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या डोंगर भागातील पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वेक्षणातील शिफारसीनुसार पाणी वितरण व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत पुरेसे पाणी जमा झाले असले, तरी मुंबईतील काही भागांतून पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. अनेक भागांत जलवाहिन्यांचे जाळे जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी जलवाहिन्यांना भूमिगत गळती लागली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील जलवाहिन्या बदलणे आणि दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. काही भागांत कोट्यवधी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नगरसेवकांनी डोंगर भागातील वस्त्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वेळोवेळी स्थायी समिती आणि पालिका सभागृहात केल्या आहेत.

नगरसेवकांच्या तक्रारी
डोंगराळ भागात पालिकेने जलवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे. काही भागांत जलकुंभ उभारण्यात आले आहेत; मात्र या कुंभांमध्ये पुरेसे पाणी येत नसल्याने डोंगर भागात कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्‍या आहेत.

या ठिकाणी समस्‍या
पश्चिम उपनगरात अंधेरी, मालाड; तर पूर्व उपनगरात कुर्ला, साकीनाका, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, चेंबूर या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96697 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..