आगामी निवडणुकात भाजपलाच यश मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगामी निवडणुकात भाजपलाच यश मिळणार
आगामी निवडणुकात भाजपलाच यश मिळणार

आगामी निवडणुकात भाजपलाच यश मिळणार

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : येणाऱ्या महापालिका, नगरपालिका व विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने बूथ पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी प्रभागातील मतदारांच्या संपर्कात राहावे, सोशल मीडियाचा वापर करावा, पण त्यावर शुभ सकाळ, शुभ रात्री असे संदेश पाठवू नका; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा, त्यामुळे आगामी निवडणुकीत हमखास यश मिळणारच, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगत पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कल्याण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी आज मंगळवारी अंबरनाथ शहराला भेट दिली. या दौऱ्यात कृष्णनगर वडवली येथील दीपक कोतेकर आणि वडवली भागातील सर्जेराव माहूरकर यांच्या प्रभागात बूथनिहाय नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांशी ठाकूर यांनी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांचा प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम प्रभागातील नागरिकांसमवेत रविवारी ऐकावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले. कोरोना काळात तसेच विविध घटकांसाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या नागरी हिताच्या कामांची माहिती त्यांनी दिली.

आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले-पाटील, कल्याण जिल्हाप्रमुख शशिकांत कांबळे, नरेंद्र सूर्यवंशी, शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील, दीपक कोतेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यापूर्वी मंत्री ठाकूर यांच्या निघालेल्या रॅलीमध्ये पदाधिकारी भरपावसात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यापूर्वी स्वानंद सभागृहात मंत्री ठाकूर यांनी महिला मोर्चा प्रतिनिधींशी संवाद साधला. महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले आदी या वेळी उपस्थित होते.

मेरा बूथ, सबसे मजबूत
---
मेरा बूथ, सबसे मजबूत असे सांगत ठाकूर यांनी बूथ पातळीवरील कार्यकर्ता हाच प्रत्येक निवडणुकीतील खरा शिल्पकार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागातील नागरिकांशी संपर्क राहावा यासाठी काही कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनी प्रभागातील नागरिकांशी सतत संपर्क ठेवण्याचे या वेळी सांगण्यात आले. देशात भाजपचे तसेच राज्यात असलेले शिंदे आणि फडणवीस सरकार पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96718 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..