वीज ग्राहकांना फसवणुकीचे संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज ग्राहकांना फसवणुकीचे संदेश
वीज ग्राहकांना फसवणुकीचे संदेश

वीज ग्राहकांना फसवणुकीचे संदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ ः बेस्टच्या वीज ग्राहकांना मोबाईलवर फसवणुकीचे संदेश येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यात पुरवठा खंडित करण्याबाबत लिहिलेले असते. तसेच तात्काळ पैसे भरण्यासाठी सांगितले जाते. अशा संदेशांच्या माध्यमातून ग्राहकांना लुबाडले जात असल्याचेही काही प्रकरणांत आढळून आले आहे. बिल भरणा करण्यासाठी एका ॲपची लिंक पाठवली जाते. या लिंकच्या माध्यमातून ग्राहकांना काही रकमेचा भरणा करण्यास सांगितले जाते. त्यानंतर ग्राहकांना पाठवण्यात येणारा ओटीपी आणि पासवर्ड चोरून खात्यातील पैसे चोरले जातात. ग्राहकांनी अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ग्राहकांनी बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. तसेच विभागीय क्रमांकावर तक्रार निवारण करावे, असेही बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96723 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..