‘वावरेपाडा येथे पक्का रस्ता तयार करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वावरेपाडा येथे पक्का रस्ता तयार करा’
‘वावरेपाडा येथे पक्का रस्ता तयार करा’

‘वावरेपाडा येथे पक्का रस्ता तयार करा’

sakal_logo
By

वाडा, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील जामघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वावरेपाडा व आजूबाजूच्या घरांकडे जायला पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवत जावे लागते. परिणामी ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या पाड्यासाठी पक्का रस्ता तयार करा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनंता वनगा यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जामघर ग्रामपंचायत हद्दीतील वावरेपाडा ते मोकाशी पाडा येथील स्थानिक नागरिकांना पक्क्या रस्त्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. वर्षानुवर्षे वहिवाटीच्या कच्च्या रस्त्यावर नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पक्क्या रस्तासाठीचे निवेदन काँग्रेस आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बाळा लहांगे, सेवादलचे तालुका अध्यक्ष जगदीश केणे, सेवादल वाडा शहर अध्यक्ष संदीप कराळे, तालुका उपाध्यक्ष श्रीजी चौधरी, सुधाकर मोकाशी, बिस्तूर दिवा, अनंता वाघ, प्रवीण मोकाशी, प्रमिला मोकाशी, चंद्रकांत जाधव, विश्वास पवार, परशराम मोकाशी आदींच्या उपस्थितीत तहसीलदारांना देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96726 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..