नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर
नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर

नवी मुंबईत स्वच्छतेचा जागर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ ः केंद्र सरकारतर्फे १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छतेचा अमृतमहोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध शहरांमध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग’ ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या नेतृत्वात ‘नवी मुंबई नाईट्स’ संघ सहभागी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धा भरवली आहे. या लीगमध्ये देशभरातील १,८०० शहरे सहभागी होणार असून नवी मुंबई शहरालाही हा मान मिळाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रहिवाशांना स्वच्छतेची सवय लागावी, तसेच ही चळवळ व्यापक व्हावी, या दृष्टीने नागरिकांना महापालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या लिंकवर नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी टॉयकेथॉन ही स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतून नागरिकांनी सुचवलेल्या नवनवीन कल्पना केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यापैकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
---
कचराविरोधात तरुणाई
नवी मुंबई महापालिकेतर्फे १७ सप्टेंबरला तांडेल मैदानावर शाळा-महाविद्यालये आणि युवकांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला तब्बल ५० हजार तरुण-तरुणी एकटवतील असा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे. या मुलांना कचरा वर्गीकरण आणि त्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. नवी मुंबई शहर कचरामूक्त कसे राहील हे समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच २५० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेच्या विषयांवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या रॅलीला संगीतकार शंकर महादेवन उपस्थित असणार आहेत.
---
मानवी साखळी
पाम बीच रोडवर नवी मुंबई महापालिका मुख्यालय ते सानपाडा सर्कल अशा साडेसात किलोमीटर अंतरावर १७ सप्टेंबरला मानवी साखळी करण्यात येणार आहे. या वेळी स्वच्छतेविषयक फलक आणि संदेशातून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. तसेच तरुण आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत जवळच्या कांदळवनांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
---
तृतीयपंथीयांचादेखील सहभाग
शहरातील नागरिकांना रस्त्यावर व उघड्यावर कचरा फेकण्यापासून परावृत्त करण्यासाठी महापालिका तृतीयपंथीयांची मदत घेणार आहे. वाशीतील तृतीयपंथीयांच्या एका समूहाशी महापालिकेने चर्चा करून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. १७ सप्टेंबरपासून हे तृतीयपंथीय रस्त्या-रस्त्यावर स्वच्छतेचे धडे देताना दिसणार आहेत.
---
बोधचिन्हांमध्ये फ्लेमिंगोचा समावेश
नवी मुंबई शहराशेजारच्या कांदळवने आणि खाडीकिनारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. या पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे याकरिता महापालिकेने शहराला फ्लेमिंगोची ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा एक भाग म्हणून नवी मुंबई संघाच्या बोधचिन्हांमध्ये फ्लेमिंगोच्या चित्राचा समावेश आहे.
---
देशभरातून सर्वोत्कृष्ट १० शहरांची या स्पर्धेत निवड केली जाणार आहे. तसेच दिल्ली येथे स्वच्छता विषयक स्टार्टटप कंपन्यांचे एक संमेलन होणार आहे. या कंपन्यांपैकी काही कंपन्यांशी महापालिकेला करारबद्ध व्हावे लागणार आहे. कचराविषयक सेवा मिळवण्यासाठी महापालिकेला करारबद्ध करण्याचे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96729 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..