मागासवर्गीय पशु संवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनचे अधिवेशन संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्गीय पशु संवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनचे अधिवेशन संपन्न
मागासवर्गीय पशु संवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनचे अधिवेशन संपन्न

मागासवर्गीय पशु संवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनचे अधिवेशन संपन्न

sakal_logo
By

कामोठे, ता. १३ (बातमीदार) : मागासवर्गीय पशुसंवर्धन अधिकारी वेल्फेअर असोसिएशनचे १५ वे राज्यस्तरीय अधिवेशन वाशीतील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात झाले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व आम्ही भारतीय लोक अशी या अधिवेशनाची संकल्पना होती. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संयोजक पी. आर. सोनवणे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार मेहता, सचिव डॉ. प्रकाश हसनालकर आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी गजभिये यांनी बार्टी संस्थेचे विविध उपक्रम, प्रशिक्षण यांची माहिती दिली. संघटनेने समाजाप्रति बांधिलकी जपण्यासाठी ऑनलाईन पोर्टल, हेल्पडेस्क तयार करावे, जेणेकरून पशुसंवर्धनविषयक योजना, माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचेल आणि त्याचा लाभ घेऊन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. पशुसंवर्धन विभागातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांचे अमूल्य योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला. पी. आर. सोनावणे यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व आम्ही भारतीय लोक या विषयावर मार्गदर्शन केले. अधिवेशनात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व भारताचे संविधान देऊन गौरवण्यात आले. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96754 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..