शिवाजी विद्यालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन
शिवाजी विद्यालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन

शिवाजी विद्यालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन

sakal_logo
By

वडाळा, ता. १३ (बातमीदार) ः राज्य राखीव दलातर्फे शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि ओळख हा कार्यक्रम मंगळवारी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयाच्या मोकळ्या आवारात पार पडला. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून राज्य राखीव दलाला मुंबईतील लालबागचा राजाच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचारण केले गेले होते. पुणे येथून आलेल्या या जवानांचा राहण्याची व्यवस्था काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात करण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आपसूकच गट्टी जमली. या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे, या हेतूने पोलिस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर यांनी राज्य राखीव दलातर्फे शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि ओळख, असा उपक्रम शाळेच्या आवारात मंगळवारी आयोजित केला. यावेळी राज्य राखीव दलाविषयी विस्तृत माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक अधिराज लोकेगावकर, मुख्याध्यापिका आदी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96764 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..