आमदार सदा सरवणकरांची पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सदा सरवणकरांची पिस्तूल जप्त
आमदार सदा सरवणकरांची पिस्तूल जप्त

आमदार सदा सरवणकरांची पिस्तूल जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : आमदार सदा सरवणकर यांचे परवाना असलेले पिस्तुल दादर पोलिसांनी सोमवारी (ता. १२) रात्री जप्त केले. शुक्रवारी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या बाचाबाचीनंतर रविवारी पहाटे शिंदे यांच्या समर्थकांची उद्धव ठाकरे समर्थकांशी हाणामारी झाली. यानंतर दादर पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटांतील शिवसैनिकांची गर्दी जमली. त्याच वेळी सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी हे पिस्तुल जप्त केले. त्यातून गोळी सुटली होती का, हे तपासण्यासाठी पोलिस ते पिस्तुल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पिस्तुल पोलिसांकडे जमा केल्याचे मान्य केले. प्रभादेवी येथे रविवारी पहाटे शिवसेनेच्या दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ठाकरे गटातील महेश सावंत यांच्यासह पाच जणांना रविवारी अटक केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला; तर शिंदे समर्थकांविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96775 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..