‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?
‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?

‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दिवाळीत, २३ ऑक्टोबरला करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर येथे प्रस्तावित दौरा आहे. यादरम्यान मोदी यांच्या हस्ते महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत संकेत दिले असले, तरी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

नागपूर ते मुंबईपर्यंत असलेल्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते सेलू अशा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरुवातीला १ मे, नंतर १५ ऑगस्टला महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याच्या घोषणा वेळोवेळी करण्यात आल्या होत्या. मात्र, उद्घाटन होऊ शकले नाही. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गाच्या उद्घाटनाचे संकेत दिले असले, तरी एमएसआरडीसीकडून उद्घटनासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नाही. उद्घाटनासंदर्भात अद्याप शक्यताच व्यक्त केली जात असल्याचे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96777 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..