‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?
‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?

‘समृद्धी’चा पहिला टप्पा दिवाळीत?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दिवाळीत, २३ ऑक्टोबरला करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर येथे प्रस्तावित दौरा आहे. यादरम्यान मोदी यांच्या हस्ते महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत संकेत दिले असले, तरी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाचा कर्करोग रुग्णालय प्रकल्प पूर्ण झाला आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे. राज्य सरकारही याचवेळी समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असून, प्राथमिक स्तरावर पंतप्रधानांनी उद्घाटनासाठी होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडण्याचे संकेत आहेत.

नागपूर ते मुंबईपर्यंत असलेल्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते सेलू अशा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरुवातीला १ मे, नंतर १५ ऑगस्टला महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याच्या घोषणा वेळोवेळी करण्यात आल्या होत्या. मात्र, उद्घाटन होऊ शकले नाही. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी महामार्गाच्या उद्घाटनाचे संकेत दिले असले, तरी एमएसआरडीसीकडून उद्घटनासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नाही. उद्घाटनासंदर्भात अद्याप शक्यताच व्यक्त केली जात असल्याचे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टप्प्याबाबत साशंकता
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना सुरुवातीला समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती; मात्र त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या उभारणीत येणाऱ्या अडचणींमुळे नागपूर ते सेलू असा पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे कोणत्याचे टप्प्याचे उद् घाटन होणार, याबद्दल अधिकाऱ्यांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96777 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..