शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच
शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : शिवसेनेच्या शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणीच होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी आज घेतली. या बैठकीत त्यांनी हा दावा केला. या वेळी आमदारांना संबोधित करताना शिंदे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केली. दरम्यान, शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असला तरी जागा अद्याप ठरलेली नसल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री शिंदे २० सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. त्याप्रमाणे आमदारांनीही मतदारसंघात दौरे करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96795 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..