साई सम्राट मित्र मंडळाच्‍या बाप्पाला भावपूर्ण निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साई सम्राट मित्र मंडळाच्‍या बाप्पाला भावपूर्ण निरोप
साई सम्राट मित्र मंडळाच्‍या बाप्पाला भावपूर्ण निरोप

साई सम्राट मित्र मंडळाच्‍या बाप्पाला भावपूर्ण निरोप

sakal_logo
By

कांदिवली, ता. १४ (बातमीदार) ः साई सम्राट मित्र मंडळाच्या बाप्‍पाचे अंगारकी चतुर्थीला भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. कमळाच्या फुलामध्ये उभी असलेली तब्बल १३ फूट उंचीची मूर्ती यंदा मंडळाने स्‍थापन केली होती.
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. भक्तांनी दर्शनासाठी रस्त्यावर दुतर्फा रांगा लावून दर्शन घेतले. मुंबईत सर्वात शेवटी विसर्जन होणारी गणेशमूर्ती असल्याने अत्‍यंत भावपूर्ण वातावरणात पूजा-अर्चा करून विसर्जन करण्यात आले. दरवर्षी कांदिवली पश्चिम येथील गावठाण तलावात या बाप्‍पाचे विसर्जन करण्यासाठी येथील यंग स्टार क्रीडा मंडळाचे स्वयंसेवक बाप्पाची वाट पाहत असतात. कारण विसर्जन करण्यात येणारी ही शेवटची गणेशमूर्ती असल्याने अतिशय सुरक्षित, नियोजन करून बाप्पाचे विसर्जन केले जाते.

अनेक वर्षांची परंपरा
अभिलाख नगर या झोपडपट्टी विभागातील सर्वात मोठी मूर्ती आणि अंगारकीच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीनंतर पाच-सहा दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करण्याची येथील परंपरा आहे. आयोजक राजू मिश्रा, मार्गदर्शक बाबा सिंग, अध्यक्ष अमर यादव यांच्‍या मार्गदर्शनाखाली दरवर्षी भांडुप येथून या मंडळाची मूर्ती आणली जाते. विभागातील प्रत्‍येक नागरिकाला बाप्पाची जास्त दिवस सेवा करण्यास मिळावी या हेतूने, गेल्या १५ वर्षांपासून अंगारकी चतुर्थीला या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96800 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..