नवी मुंबईत सीबीएसईच्या नवीन शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत सीबीएसईच्या नवीन शाळा
नवी मुंबईत सीबीएसईच्या नवीन शाळा

नवी मुंबईत सीबीएसईच्या नवीन शाळा

sakal_logo
By

वाशी, ता. १५ (बातमीदार) ः नवी मुंबईमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या सीबीएसई शाळा सुरू झाल्या. सुरुवातीला दोन शाळा होत्या. या शाळांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता पालिका आणखी दोन शाळा लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
शहरातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनादेखील गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण केंद्रीय शिक्षण बोर्डातून वाजवी शुल्कात मिळावे, यासाठी आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे आणि नेरूळ येथे दोन सीबीएसई शाळा सुरू केल्या होत्या. या शाळांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे वाढीव शाळांची गरज लक्षात घेता आणखी दोन शाळा सुरू करण्याची मागणी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच नव्याने प्रस्तावित सीबीएसईच्या शाळा वाशी आणि कोपरखैरणे येथे सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची सूचनाही नाईक यांनी केली होती. या मागणीला आयुक्त अभिजीत बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत.
------------------------
नेरूळमधील इमारतींचे मजले वाढणार
नेरूळमध्ये असलेल्या पालिकेच्या सीबीएसई शाळेमधून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. ही अडचण माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी आमदार नाईक यांच्या माध्यमातून आयुक्तांना अवगत करून दिली.‌ तसेच या दोन मजली शाळा इमारतीवर आणखी दोन मजले वाढविण्याची मागणीदेखील केली होती. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96804 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..