दक्षिण कोरियामध्येही गणेशोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण कोरियामध्येही गणेशोत्सव उत्साहात
दक्षिण कोरियामध्येही गणेशोत्सव उत्साहात

दक्षिण कोरियामध्येही गणेशोत्सव उत्साहात

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः मराठी मंडळ कोरियातर्फे दोन वर्षांच्या खंडानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षे कोविड काळात निर्बंध असल्यामुळे मराठी मंडळ कोरियातर्फे गणेशोत्सव केवळ ऑनलाईन पूजा आणि आरती अशा पद्धतीनेच होत होता. मात्र यंदा तेथेही निर्बंध शिथिल झाल्यामुळे हा उत्सव नियोजन करून मोठ्या प्रमाणावर कोरिया इंडिया असोसिएशनच्या सभागृहात साजरा झाला.
यानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने अतिथी स्वागत, पुष्प आरास, सामूहिक आरती, गणेश वंदना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चविष्ट प्रसाद भोजन असे या उत्सवाचे स्वरूप होते. उत्सव यशस्वी होण्यात मराठी मंडळ कोरियाचे नियोजन मंडळ, कोरियातील सर्व मराठी आणि अमराठी बांधव, सजग देणगीदार, कोरियाच्या शैक्षणिक क्षेत्रातील मराठी कार्यकर्ते, कोरिया इंडिया असोसिएशन, इंडियन इन कोरिया तसेच इंडियन स्टुडंट्स ॲण्ड रिसर्च इन कोरिया ग्रुप या सर्व संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य होते.

मराठी मंडळाचे सामाजिक कार्य
कोरियातील मराठी जाणकार आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन २०१० मध्ये मराठी मंडळ कोरियाची स्थापना केली आहे. या मंडळातर्फे गणेशोत्सव, कोजागिरी, गुढीपाडवा, मकर संक्रांत हे मराठमोळे सण साजरे केले जातात. त्‍याबरोबरच महाराष्ट्रातील आणि देशातील कुठल्याही आपत्तीत देणगी स्वरूपात साह्य करत मराठी मंडळ कोरियाने आपल्या सामाजिक बांधिलकीचीही जाण राखली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96805 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..