विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सुरुंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सुरुंग
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सुरुंग

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सुरुंग

sakal_logo
By

वाशी, ता. १५ (बातमीदार) ः खारघरमध्ये सोमवारी स्कूल बसला आग लागण्याची घटना घडली होती. चार वर्षांपूर्वीदेखील पनवेल येथील पळस्पे फाट्याजवळ अशाच पद्धतीने स्कूल बसला आग लागण्याची घटना घडली होती. पण, या दोन्ही अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची समस्या मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय क्षेत्रात १ हजार ५७५ अधिकृत स्कूल बस आहेत; तर काही परवाना नसतानादेखील रिक्षा, व्हॅनमधून प्रवास करतात. कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने बंद होती. मात्र, सध्या सर्वकाही पूर्ववत झाल्याने शाळादेखील सुरू झाल्या आहेत. पण शहरात अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी खारघरमधील स्कूल बसला लागलेल्या आगीमुळे हा धोका अधोरेखित झाला असून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस व इतर गाड्यांचे विमा प्रमाणपत्र, वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक मदतनीस, आप्तकालीन परिस्थिती बाहेर पडण्याचे मार्ग अशा बांबीची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
------------------------------
वाहतूक नियमांबाबत उादासीनता
वाशी आरटीओ कार्यालय व नवी मुंबई महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी नुकतेच वाहनचालक, बसेस चालक-मालक संघटना, ड्रायव्हिंग स्कूल संघटना तसेच शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित घटक यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. मात्र, सध्या अशा प्रकारच्या कार्यशाळा होत नसल्याने वाहतूक नियमांबाबत दुर्लक्ष होत आहे.
-------------------------------------
नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई
कोरोनाच्या कालखंडापासून स्कूल बस बंद अवस्थेत होत्या. या वर्षापासून स्कूल बस सुरू झाल्यांनतर नवी मुंबई आरटीओकडूनदेखील बेशिस्त स्कूल बसचालकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. नवी मुंबई आरटीओकडून जुलै महिन्यापासून ६३ स्कूलबसवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
--------------------------------------
स्कूल बसचा अपघात झाल्यांनतर त्यामधून विद्यार्थ्याना सुरक्षित कसे बाहेर काढावे, यासाठी स्कूल बसच्या चालक तसेच मदतनीस यांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीदेखील बघ्याची तसेच व्हिडीओ व फोटो काढत राहण्यापेक्षा मदतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
------------------------------------
काही स्कूल बसचे मालक हे फिटनेस सर्टिफिकेट नसतानादेखील वाहन रस्त्यावर चालवतात. तशा वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली पाहिजे. तसेच शाळांचे विद्यार्थी वाहनांतून प्रवेश करत असल्यामुळे स्कूल बसच्या चालक तसेच वाहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- संतोष शेट्टी, सल्लागार, स्कूल बस असोसएिशन
----------------------------------------
स्कूल बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरत असल्याचे दिसून येते. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा आहे. तसेच शाळा प्रशासनानेदेखील स्कूल बसच्या वाहनांचे पेपर तपासणे आवश्यक आहे; तर आरटीओनेदेखील बेकायदा वाहनांवर कारवाई करावी.
- अ‍ॅड. विशाल मोहिते, पालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96806 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..