जव्हारवासीय खड्ड्यांनी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारवासीय खड्ड्यांनी त्रस्त
जव्हारवासीय खड्ड्यांनी त्रस्त

जव्हारवासीय खड्ड्यांनी त्रस्त

sakal_logo
By

जव्हार, ता. १४ (बातमीदार) : पर्यटनाचा ब दर्जा लाभलेल्या जव्हार शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पाच बत्ती या परिसरात मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे लहान बालके, महिला व वृद्ध नागरिक रस्त्यावर चालत असताना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज न येता पडून जखमी झाले आहेत; तर अनेकांना या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून एखादे वाहन गेल्यास पाणी अंगावर उडत आहे. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुलांना होत आहे.
...
जव्हार नगर परिषदेच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व या भागात आहे. जलवाहिनीमध्ये काही बिघाड झाल्यास खोदकाम करावे लागते. त्यामुळे येथे खड्डे पडले आहेत; पण हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागात सांगितले आहे. शिवाय या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित असून पाऊस कमी झाल्यावर काम केले जाणार आहे.
- प्रवीण जोंधळे, अभियंता, बांधकाम विभाग, जव्हार नगर परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96814 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..