कल्याण आगाराला ६५ लाखांचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण आगाराला ६५ लाखांचे उत्पन्न
कल्याण आगाराला ६५ लाखांचे उत्पन्न

कल्याण आगाराला ६५ लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : गणेशोत्सवानिमित्त कल्याण बस आगारातून कोकणात विशेष एसटी बस सोडल्या होत्या. मागील वर्षापेक्षा यंदा दुपटीने गाड्या कोकणात धावल्या होत्या. मागील वर्षापेक्षा यंदा ५० लाख रुपयांनी जास्त उत्पन्न आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी कल्याण डेपोमधून कोकणात १८० एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. त्यात १० लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले होते; मात्र या वर्षी सरकारने कोरोनाचे निर्बंध उठवल्याने राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा कोकणवासीयांसाठी कल्याणमधून मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या होत्या. या सेवेला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

या वर्षी गणेशोत्सवानिमित्त कल्याण डेपोमधून कोकणात ३०३ विशेष बस; तर परतीच्या प्रवासासाठी १२ अशा एकूण ३१५ बस सोडण्यात आल्या होत्या. या सेवेचा सुमारे १५ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असून त्यातून सुमारे ६५ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

गेल्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता; मात्र या वर्षी एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या टीमवर्कमुळे आगाराच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली.
- विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण एसटी आगार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96825 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..