वसई विरार जोडणारा निर्मळ मार्ग कोंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरार जोडणारा निर्मळ मार्ग कोंडीत
वसई विरार जोडणारा निर्मळ मार्ग कोंडीत

वसई विरार जोडणारा निर्मळ मार्ग कोंडीत

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई आणि विरार या दोन शहरांना जोडणाऱ्या निर्मळ मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मात्र याठिकाणी कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक विभागानेदेखील पाठ फिरवली असल्याने वाहतूक सुरळीत कशी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
वसई, नालासोपारा व विरार भागातील वाहनांची वर्दळ निर्मळ मार्गावर असते. पंचायत समिती, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, महापालिका कार्यालय, भूमी अभिलेख विभाग यांसह अन्य कामकाजानिमित्त हा मार्ग सोपा आहे. त्यामुळे निर्मळ मार्गावर मोठी रहदारी असते. मात्र निर्मळ नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. निर्मळ ते भुईगाव मार्गावर खड्डे असल्याने प्रवाशांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. या ठिकाणी शाळा असून विद्यार्थी सायकलने प्रवास करतात. मात्र खड्ड्यांमुळे त्यांचे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती केली असली तरी पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
----------------------
शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास खडतर
निर्मळ येथे शाळा आहे, शाळेत मुलांची ये-जा असते. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो, तसेच खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक आदींचा प्रवास खडतर होत आहे.
----------------------
दुतर्फा वाहने पार्क
नेहमीच वाहतूक कोंडी होणाऱ्या सोपारा ते निर्मळ मार्गावर वाहतूक पोलिसच नसल्याचे दिसून येत आहेत. कोंडी दुरू करण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले जात नाही. एकीकडे अरुंद रस्ता, त्यातच दुतर्फा रस्त्यावरही अनेक जण वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे यावर वाहतूक विभागाने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
-------------
वसई-विरार शहराशी जोडला गेलेला निर्मळ मार्ग नेहमीच कोंडीत सापडत आहे. वाहतूक विभाग याकडे लक्ष देत नाही. तसेच एकही वाहतूक विभागाचा कर्मचारी तैनात नाही, तर रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.
- पंकज चोरघे, माजी सभापती, महापालिका
-------
निर्मळ-सोपारा महामार्गाच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यात येतील. तसेच शनिवार व रविवारी वाहतूक विभागाचे कर्मचारी गस्त घालणार आहेत. तशा सूचना देण्यात आल्या आहेत, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.
- सागर इंगोले, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96826 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..