विद्याभवन शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अध्ययन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याभवन शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अध्ययन
विद्याभवन शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अध्ययन

विद्याभवन शाळेत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अध्ययन

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी घाटकोपर येथील विद्याभवन शाळेतील शिक्षकांचा नेहमीच प्रयत्न असतो. पारंपरिक, चौकटीबद्ध अध्यापन न करता नावीन्यपूर्ण अध्यापन करून विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. याच उपक्रमांतर्गत शाळेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षिका मीनल भोळे यांनी इतिहास या विषयांतर्गत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे.
पाठ्यपुस्तकातील ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणावर आधारित विद्यार्थ्यांनी अवांतर माहिती व त्यासंबंधित चित्रे, प्रतिकृती, वस्तू गोळा केल्‍या. त्‍याचा योग्य प्रकारे अभ्यास करून शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली वर्गामध्ये अध्यापन करण्यात आले. त्यासाठी वर्गातील काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे व इतर सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना माहिती गोळा करण्यासाठी आपापल्या परीने मदत केली. सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा उपक्रम राबवला गेला. अतिशय सुंदर फलक लेखन करून तसेच अध्यापनात इतर विद्यार्थ्यांच्या सहभाग घेऊन, चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे दिलेल्या भागावरचे अध्यापन केले. या उपक्रमांसाठी शाळेचे संचालक राजेंद्र बोऱ्हाडे व मुख्याध्यापिका योगिनी पोतदार यांचा पाठिंबा लाभला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96831 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..