गुन्हेगारीत घट, नोंदणी मात्र वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारीत घट, नोंदणी मात्र वाढली
गुन्हेगारीत घट, नोंदणी मात्र वाढली

गुन्हेगारीत घट, नोंदणी मात्र वाढली

sakal_logo
By

केदार शिंत्रे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : गुन्ह्यांच्या नोंदणीत देशातील अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आल्याचे ‘राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो’ने (एनसीआरबी) २०२१ मध्ये जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. २०२१ मध्ये भारतीय दंडसंहितेअंतर्गत (आयपीसी) सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची देशात सर्वाधिक तीन लाख ६७ हजार २१८ प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली; तर महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात तीन लाख ५७ हजार ९०५ गुन्हे नोंदवले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.
एकीकडे नोंदणी वाढली असली, तरी २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये गुन्हेगारीत घट झाल्याचे समोर आले आहे. राज्यात २०२० मध्ये तीन लाख ९४ हजार १७ गुन्हे नोंदवले गेले होते. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ही घट ६.८ टक्के आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत मुंबई यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये मुंबईत अल्पवयीन मुलांच्या ६११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. ज्यात चोरी आणि मारहाणीच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे.

दिल्ली गुन्ह्याचीही ‘राजधानी’
देशाची राजधानी दिल्लीत २०२१ मध्ये सर्वाधिक २.८९ लाख गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या; तर मुंबईत ६३ हजार ६८९ गुन्हे नोंदले गेले. त्यानुसार दररोज सरासरी किमान १७४ विविध प्रकारचे गुन्हे नोंदवले गेले. आकडेवारीनुसार २०१९-२० च्या तुलनेत २०२१ मुंबईत गुन्हेगारीमध्ये २७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबईत २०२१ मधील गुन्हे
चोरी- ७,८२०
फसवणूक- ४,८९९
रॅश ड्रायव्हिंग- २,२८२
लैंगिक छळ- १,५९०
बलात्कार- ३६४
दंगल- ३०३
हत्या- १६२

महिला अत्याचारात महाराष्ट्र तिसरा
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी २०२१ मध्ये देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज ११२ महिलांवर अत्याचार होत असल्याची नोंद आहे.

राज्य
उत्तर प्रदेश- ५६,०८३
राजस्थान- ४०,७३८
महाराष्ट्र- ३९,५२६
एकूण- ४,२८,२७८

महानगर
दिल्ली- ३,९४८
मुंबई- १,१०३
बेंगळूरु- ५७८

महाराष्ट्र बलात्काराच्या गुन्ह्यात चौथे
बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदणीत महाराष्ट्र २०२१ मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज सरासरी सहा; तर मुंबईत एका बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद होते.

राज्य
राजस्थान- ६,३३७
मध्य प्रदेश- २,९४७
उत्तर प्रदेश- २,८४५
महाराष्ट्र- २,४९६

महानगर
दिल्ली- १,२२६
जयपूर- ५०२
मुंबई- ३६४

महिला अपहरण
राज्य गुन्हे
उत्तर प्रदेश १०,५७४
बिहार ८,६६१
महाराष्ट्र ७,५५९

महिला विनयभंग
राज्य गुन्हे
ओडिशा १४,८५३
महाराष्ट्र १०,५६८
उत्तर प्रदेश ९३९

महानगर गुन्हे
दिल्ली २,०२२
मुंबई १,६२५
जयपूर ५८६
----------
राज्यात सायबर गुन्हे किरकोळ वाढले
राज्यात २०२१ मध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांमध्ये १.५ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. महाराष्ट्रात नोंदवलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये डेबिट/ क्रेडिट कार्ड, लैंगिक शोषण, बदनामी, वैयक्तिक सूड आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यांची नोंद होती.

राज्य
तेलंगणा- १०,१०३
उत्तर प्रदेश- ८,८२९
कर्नाटक- ८,१३६
महाराष्ट्र- ५,५६२

राज्यातील निम्मे सायबर गुन्हे मुंबईत
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २०२१ मध्ये विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची एकूण २,८८३ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. राज्यात नोंदवण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांच्या एकूण ५० टक्के गुन्हांची नोंद मुंबईत झाली आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांची वाढ १५.६ टक्के आहे.
---

दंगल
राज्य
महाराष्ट्र- ८,७०९
बिहार- ६,२९८
उत्तर प्रदेश- ५,३०२
कर्नाटक- ४,१९३
तामिळनाडू- २,२७५
हरयाना- २,२५३
ओडिशा- २,२२०
----

महाराष्ट्र राज्यात गुन्ह्यांची नोंद सर्वांत जास्त होते हे खरे असले, तरी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. कारण गुन्हे घडले तरी त्याची नोंदही केली जाते. काही राज्यांमध्ये गुन्ह्यांची नोंदसुद्धा होत नाही. महाराष्ट्र पोलिस दल हे सक्षम दल आहे.
- पी. के. जैन, माजी आयपीएस अधिकारी

गुन्ह्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले याचा अर्थ गुन्हेगारी निश्चित वाढली आहे; परंतु बरेचसे गुन्हे राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यांमुळे नोंदवले जातात. त्यामुळे असे किती गुन्हे नोंदवले गेले याचे, विश्लेषण होणेही गरजेचे आहे.
- धनराज वंजारी, माजी पोलिस अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96836 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..