आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला प्रथम पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला प्रथम पुरस्‍कार
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला प्रथम पुरस्‍कार

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला प्रथम पुरस्‍कार

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १४ (बातमीदार) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या तालुक्यामधील महाराणा प्रतापसिंग शिक्षण संस्था मुंबई, संचालित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. कलिना विद्यापीठ, सांताक्रूझ येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ग्रामीण भागातील ३०० हून अधिक महाविद्यालयांनी यासाठी नाव दिले होते. आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, अधीक्षक संजय रावराणे, सहसचिव विजय रावराणे व शैलेंद्र रावराणे यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रो. कुलगुरू रवींद्र कुलकर्णी तसेच प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96837 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..