सूर्यानगर रस्त्यावर खड्डेच खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यानगर रस्त्यावर खड्डेच खड्डे
सूर्यानगर रस्त्यावर खड्डेच खड्डे

सूर्यानगर रस्त्यावर खड्डेच खड्डे

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : सूर्यानगर वसाहत ते डहाणू-नाशिक मुख्य रस्ता हा जवळपास दीड किलोमीटर रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे सूर्यानगर परिसरात असलेल्या दोन आश्रमशाळा, एक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा व तेथे राहणारी काही कुटुंबे यांना या रस्त्यावरून प्रवास करणे खूप त्रासदायक होत आहे. आजूबाजूला असणाऱ्या पाड्यातील विद्यार्थी, लहान मुले, रुग्ण यांना या रस्त्यातील खड्डे आणि चिखलातून प्रवास करावा लागत आहे. यासाठी वेती-वरोती ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना हा रस्ता सुधारणा करण्यासाठी निवेदन दिले आहे.
डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी व कवडास धरणाची निर्मिती केली. त्या वेळी सूर्यानगर येथे पाटबंधारे विभागाची वसाहत निर्माण केली होती; पण धरणाची कामे पूर्ण झाल्याने येथील अनेक कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त गेले. सध्या येथे मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर या शहरांसाठी पाणीपुरवठा करणारा प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. यासाठी सूर्या नगर वसाहत रिकामी केली गेली, त्याजागी जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात येत आहे. एमएमआरडीएकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने सूर्यानगर वसाहत ते डहाणू- नाशिक मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे या परिसरात असलेल्या दोन आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा यातील विद्यार्थ्यांसह या भागातील रहिवाशांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी वेती-वरोती ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

रस्त्याची डागडुजी करणार
एमएमआरडीएचे अधिकारी कुणाल शेंडे यांनी सांगितले की, सध्या जलप्रकल्पाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर मोठी अवजड वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता आम्ही चांगला बनवून देणार आहोत; पण येथील नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी रस्त्याची डागडुजी केली जाईल.
.....
हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय आहे. त्यात अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, रुग्ण, नागरिक यांना त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिले आहे.
- विठ्ठल भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य वेती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96839 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..